नवीन लेखन...
Avatar
About श्रीकांत पेटकर
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

अखेरचे येवून जा एकदा

निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा / तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा ! कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा ! अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा! झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा ! शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा! जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा! @ “कौशल” श्रीकांत बापूराव पेटकर, कल

गुलाब कशाला मी देवू

गुलाब कशाला मी देवू , उद्याच ते सुकणारे काव्य गुंफले मी गं, सदाच ते टिकणारे! भाव चालतो येथे, असली का अपुली प्रिती? बसले चौकाचौकावर, फुलास ते विकणारे ! येती अनंत अडथळे,त्यांचा मार्ग हा असावा जाणेच भाग त्यावरुनी,नाहीच ते चुकणारे! हारलो नाही संपलो,सुरुवात ही तर खरी कटाक्ष तिरका मारी,उगाच ते जिंकणारे! नकोच विचार सुडाचा,युध्दाने वाढते युध्द लावूच […]

अनामिका

  चो रु न बघणे माझे तसेच अन तुझेही तसेच काही न जमणे माझे तसेच अन तुझेही तसेच / संधी येती पुन्हा पुन्हा कितीतरी अनेकदा  धिटाई न करणे माझे तसेच अन तुझेही तसेच / किती काळ जाई आणि किती भवताल हासे काही न करणे माझे तसेच अन तुझेच तसेच / खुणावी बट तुझी गालावर येऊन जरा […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..