एक चित्रकर्मी: श्री मोहन लोके
लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची अनेक प्रतिबिंब मनावर कोरली गेली आहेत. अशीच एक व्यक्ती समईच्या प्रकाशात शिवपिंडीवर विराजमान असलेल्या बेलपत्रावर गुलाबाच्या फुलाने छानपैकी विराजावे त्याप्रमाणे मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेली आहे. ती महानता आपणां सर्वाना ठाऊक असेलही.पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तरी एक गोड कहर उसळतो. वामनमूर्ती … गव्हाळवर्णाची आणि सदैव प्रसन्न आणि हसतमुख […]