भारतीय रेल्वेची बांधणी
१८४३ साल उजाडलं. जगातली पहिली रेल्वे धावली त्याला अठरा वर्ष झाली होती. एव्हाना ब्रिटिश सरकारच्या गाठीशी युरोपियन रेल्वे बांधणीचा बराच अनुभव जमा झाला होता. तो अनुभव हाताशी घेऊन १८४३ मध्ये भारतीय रेल्वेच्या बांधणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष हालचाली सुरु झाल्या. जॉर्ज क्लार्क या ब्रिटिश इंजिनीअरने मुंबईजवळील भांडूप या खेड्यात काही प्रतिष्ठित व्यक्तींची सभा घेतली आणि त्या सभेत रेल्वेची स्थापना केली. […]