जगभरातले काही महाकाय रेल्वे प्रकल्प
१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका) तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला ‘ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग’ म्हणून ओळखलं […]