नवीन लेखन...
Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

रेल्वे प्रवासाचे नियोजन – भाग ४

भारतीय रेल्वेचं वर्तुळाकार मार्गाचं (सर्क्युलर) तिकीट – एक अनुभव १९५० ते १९६० सालांदरम्यान रेल्वेचं विविध विभागांचं अतिशय स्वस्त असं ‘झोनल तिकीट’ मिळत असे. निरनिराळी गावं त्या तिकिटात समाविष्ट होत व त्याची मुदत अगदी महिनाभर असे. निरनिराळ्या गावांतील नातेवाईक शोधून त्यांच्याकडे मुक्काम ठोकण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. गमतीने तिकीटधारकाला ‘झोन्या’ म्हणत. ‘झोन्या’ केव्हा दत्त म्हणून समोर […]

मलेरिया विरुद्ध औषधे व त्यांचा इतिहास

मलेरिया व औषधे मनुष्य जातीला मलेरिया सदृश तापाने २५०० ते ३००० वर्षांपासून पछाडल्याचे दाखले आहेत . हा रोग कशा पद्धतीने होतो ह्याचे गूढ उकलण्यास १ ९ वे शतक उजाडावे लागले ; परंतु त्या आधी या तापावर प्रभावी औषधे वापरल्याच्या नोंदी आहेत . २००० वर्षांपूर्वी चीनमध्ये अशा तापावर चॅगशॅन ( डिकोरा फेरीफ्युगा ) वनस्पतीचे चूर्ण वापरीत असत […]

रेल्वे प्रवासाचे नियोजन – भाग ३

रेल्वे टाईमटेबल रेल्वे टाईमटेबल’ या पुस्तकाचं रेल्वे प्रवासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. रेल्वेप्रेमींचं प्रवासाइतकंच ‘टाईमटेबल’ पुस्तकावरही मनापासून प्रेम असतं. प्रवासात ‘टाईमटेबल’ जवळ बाळगणारा हा खरा ‘जातीचा प्रवासी’ असतो. प्रवासाची आखणी करण्यापासून, जाणारी-येणारी गाडी पक्की करणं, गाडीच्या वेळा, प्रवासास लागणारा वेळ, अशा अनेक गोष्टींची इत्यंभूत, खात्रीलायक माहिती देणारं ‘टाईमटेबल’ हे एकमेव पुस्तक असतं. ज्ञानेश्वरीची ओवी जशी अभ्यासपूर्वक समजून […]

मलेरिया लस निर्मिती

वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात […]

मलेरिया – तापाचे अभयत्व विज्ञान ( Immunity )

काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते . १ ) Duffy Antigen Negativity २ ) Sickle Cell […]

रेल्वेप्रवासाचं नियोजन – भाग – २

रेल्वेप्रवासाचं नियोजन साधारण १९५५ सालापासून तिकिटाचं रिझर्व्हेशन करणं प्रवासीमंडळींमध्ये रुळू लागलं होतं. त्या तिकिटावरचा पेननं लिहिलेला डबा क्रमांक आणि सीट क्रमांक वाचणं म्हणजे एक दिव्यच असे. पुढे गाडीत हमखास जागा पकडून देणारे स्टेशनवर उभेच असत. त्यांचं जाळंच तयार झालेलं होतं. त्यांच्यातील काही जण गाडी यार्डातून निघून फ्लॅटफॉर्मला लागतानाच अनेक जागा अडवून येत. मग काय? सीट देण्याचा […]

रेल्प्रवे वासाचं नियोजन – भाग १

लांब पल्ल्याच्या प्रवासीगाड्यांचं नियोजन मेल, एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अशा बारा तासांपासून अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी तासांचा प्रवास करणाऱ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणतात. त्यांचं नियोजन विविध विभागांमार्फत होत असतं. इंजिनड्रायव्हर्स, गार्ड, हेल्पर, तिकीट तपासनीस, या सर्वांच्या एकत्रित काम करणाऱ्या गटाला ‘क्रू’ म्हणतात. या सर्वांची ड्यूटी साधारणतः आठ ते दहा तासांनंतर […]

मलेरियाचे निदान : रक्त व लघवीची तपासणी

मलेरियाचे निदान करण्यात रक्ताच्या तपासणीचा मोलाचा वाटा आहे . यामध्ये दोन विशिष्ट पद्धतींनी तपासण्या केल्या जातात . अ ) रक्तातील मलेरियाचे परोपजीव शोधण्यासाठी केलेल्या चाचण्या ब ) मलेरियाच्या तापामुळे रक्तातील विविध घटकांवर व रुग्णाच्या शरीरातील इतर इंद्रियांवर जो परिणाम होत असतो , त्यांच्यामधील बदल व उतारचढाव दाखवून देणाऱ्या रक्ताच्या व लघवीच्या काही चाचण्या केल्या जातात . […]

रेल्वे बांधणीचा परामर्श

जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया […]

मलेरिया रोगाची लक्षणे व चिन्हे

मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे […]

1 2 3 4 5 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..