युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग २
अॅमस्टरडॅम ते लंडन हा पहिला प्रवास रेल्वे-बोट-रेल्वे’ असा होता व त्यातही साध्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. अॅमस्टरडॅम रेल्वे स्टेशन अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं आहे. तेथील स्वच्छता, टापटीप व तुरळक गर्दी या गोष्टीही मनात आणि नजरेत भरतात. १५ ते २० प्लॅटफॉर्म्सवर अनेक गाड्या निघण्याच्या प्रतीक्षेत होत्या. आमच्या डब्यात मात्र प्रवाशांची बरीच गर्दी होती. जेमतेम बसण्याची सोय झाली […]