लाल डगलेवाला रेल्वेहमाल
स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे ‘कुली’; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर’ ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे. ‘कुली’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ ‘दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी’ असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात […]