नवीन लेखन...
Avatar
About विश्वनाथ शिरढोणकर
मी एक सेवानिवृत्त असून साहित्यिक आहे. माझी हिंदी मराठीत 25 पुस्तके प्रकाशित असून, kUKU FM वर कादंबरी - मी होतो मी नव्हतो - 65भागात(अवधी-6-30 तास) आणि AAVAAJ.COM वर 16 कथा ऑडियो स्वरुपात उपलब्ध आहे. कादंबरी महाराष्ट्र शासन च्या ग्रंथमान्य यादीत सामील असून अनेक विद्यापिठात माझी कथा, कविता पाठ्यक्रमात सामील आहे.100 पेक्षा जास्त कथा,250 पेक्षा जास्त कविता आणि 150 पेक्षा जास्त लेख प्रकाशित. अनेक दिवाळी अंकात नियमित प्रकाशन. अनेक पुरस्कार/सम्मान प्राप्त.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (चंद्रपूर) सकट अनेक शहरात साहित्यिक कार्यक्रमात सहभाग.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री भारत सासणे यांच्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांसाठी लाभल्या आहेत. मी बृहन्महाराष्ट्रांतील एक आघाडीचा साहित्यिक आहे.

मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 2

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे. […]

मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 1

साधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. […]

हजार तोंडांचा रावण – एक झलक !

डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली. […]

हजार तोंडांचा रावण – मनोगत

जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे. […]

बीज भाषण : मराठी कथात्म!

मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा. […]

गजल की कविता

गजल आहे की कविता आहे गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !! राग आहे की ताल आहे सूर शब्दांची धमाल आहे !! देव आहे की भक्त आहे आरोळीतला मृदंग टाळ आहे !! मी आहे की तू आहे डोक्यावर ठेवलेली झाल आहे !! आवाज आहे की सुर आहे एक गळ्यातला स्वर आहे !! रक्ताची आहे की भावनांची आहे जी […]

प्रश्न !!

माझ्या मते वाया गेले आयुष्य माझे तुझ्या मते शुल्लक होते प्रश्न सारे !! बोलण्यासाठी शब्द कुठे शिल्लक होते ? शब्दांसाठी शब्द हे, शब्दांचे खेळ सारे !! नको विचारू उत्तर, जीवघेण्या प्रश्नांचे प्रश्नांने उपजती प्रश्न, राहूदे ते प्रश्न सारे !! जगण्याचा बहाणा तुझा की माझा खरा आज माझी परीक्षा तूच ओळखून घे सारे !! कुठे नेऊ कसे […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..