कला आरसेनिर्मितीची
काचेतून आरपार निघून जाणार्या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं. […]