काव्य कलश
ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत, होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी, कलश भरून आला, नाहून जाता त्यात, देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com