पुंडलिकाचे दैवत
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे । सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे । कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला […]