नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे आपल्या जे […]

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।। नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।। जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

मला न पटलेली कथा

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या […]

‘मृत्युदंड ‘ प्रक्रियेमधील एक दिलासा !

नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली.  एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार    Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या. अनेक […]

असुरक्षीत जीवन

आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा    // धृ // प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा  – – – १ बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – – – 2 सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेना इथे लागतो केवळ पैसा रडते जीवन ढसाढसा – – – ३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।। विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।। देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।। फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।। अदृश्य असले नाते, असावे […]

1 127 128 129 130 131 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..