नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां  […]

सूड वलय

उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]

पूर्णेच्या परिसरांत !

जेंव्हा ठरले गावी जाणे,हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता,आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता,सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये,राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी,सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली,क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी,जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण,पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो,झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद,झाडा खालती बसूनी मळ्यामधली मजा लुटली,नाचूनी गाऊनी विहिरीमधल्या पाण्यात,मनसोक्त ते डुबूनी ऐकल्या होत्या कथा परींच्या,तन्मयतेने बसूनी आज सांगे त्याच कथा मी,काका मुलांचे बनुनी वाडा सांगे इतिहास सारा,पूर्वज जगले कसे भव्य खिंडारी उमटले होते,कर्तृत्वाचे ठसे बापू, आबा, मामा, काका,मामी वाहिनी जमती कमी न पडली तसूभरही,प्रेमामधली नाती मीही बदललो, गांवहीं बदलले,काळाच्या ओघांत आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।। नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।। स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।। स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।। ओंगळपणाचे […]

मला कळलेला रावण

आजीने सांगीतलेली कथा आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक […]

जीवन आहे एक कल्पवृक्ष

जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती   ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख   ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान   ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  […]

मला भाराऊन टाकल याने

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो […]

1 129 130 131 132 133 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..