नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या || हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं || समजतील दुःखी तुजला , नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने , फूलवित रहा भाव || जाणून घे स्वभाव सर्वांचे , रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे, तुझ्याच […]

जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई संसाराचा   ।।३।। […]

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद […]

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे….१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व […]

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही,  प्रभूचे सतत नामस्मरण ,  असू घ्या मुखांत …१ काय सांगावी,  नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें,  प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३, नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय,  ईश समर्पण नामानी साधती,  प्रभू सर्वजण…५   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

देवकी माता !

काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा  । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा  ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित  । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत  ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक  । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच  घटक  ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत  । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत  ।।   […]

लज्जा

  साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची […]

ईश्वरी गुप्तधन

  होता एक गरीब बिचारा  । किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।। कौलारु जुनी पडवी निवारा  । जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।   परिस्थितीनें गेला गंजूनी  । आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।। शरीर जर्जर झाले रोगांनी  । जगण्याची आशा उरे न मनीं  ।।   अवचित घटना एके दिनीं  । धन सापडे जमिनीतूनी  ।। मोहरांचा तो होता […]

एक जुनी आठवण

एक जुनी आठवण डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक – डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना […]

1 131 132 133 134 135 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..