आधुनिकता
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते । आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते ।। ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते । प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते ।। मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं ।। मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार । ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार ।। […]