नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१, दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती….३, वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका […]

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

उर्जा अर्पण

करा सर्वस्व प्रभूसी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही       उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण       साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना       उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना       सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान     प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच प्रभूसी अर्पण होई डॉ. भगवान […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

सिकंदरचे खंतावलेले मन

राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे […]

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।। कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।। शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।। कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।। शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]

1 137 138 139 140 141 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..