नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा  १ जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी   २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे  ३ कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या– १—  या मित्रांनो सारे या,  हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात […]

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे हासत खेळत आनंदाने […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे, वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म ।।१।। वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल ।।२।। आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई ।।३।। अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती, केवळ त्यातील […]

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी, आनंद […]

आधार

वेलींना आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी नष्ट करिल तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

पिंडीतील ब्रह्मांड

विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते […]

1 138 139 140 141 142 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..