नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

वातावरणाची निर्मिती

वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]

गाण्याच्या कलेची किंमत

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं डॉ. […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण करणे हाच […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे  । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे  ।। बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे  । निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे  ।। कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता  । क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता  ।। शिवीगाळ स्वभाव असतां   आदरभाव कसा मिळे  । शत्रुत्वाचे […]

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]

कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं ,  ढळत्या आयुष्यीं  । संधिप्रकाश दिसत होता,  सूर्य अस्ताशीं  ।१। काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे  । कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे  ।२। समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें  । खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे  ।३। विषय सारे अथांग होते,  अवती भवती  । कसा पोहू या ज्ञान सागरीं,  विवंचना होती  […]

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।। अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।। अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।। सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।। यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी […]

जन्म-मृत्युचे चक्र.

खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।। सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना । शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।। अप्रतिम  शहर असूनी, नाव तयाचे असे  ‘पुरूष’ । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे ‘ईश ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी […]

दासी मंथरेमधला विकल्प

रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच […]

1 141 142 143 144 145 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..