नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सूर्योदय

  प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे […]

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येते, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असते…१, या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व निसर्गाचे ,  तीन गुणांनी बनले, उत्पत्ती लय स्थिती,  यांनी सर्वत्र व्यापिले…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

गर्भातील अभिमंन्यू

  श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, […]

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

  धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने […]

कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो  । भाव तरंगाना आकार देऊनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला,  हेच समजोनी ….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

सत्व रज तमो गुण

त्रिभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।।   कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।   प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येती ।।३।।   राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून ।।४।। […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण देवा   ।।धृ।।   देह झुकला पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण  देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते मनां मनाचा ताबा देहावरी तेच तुजला प्रणाम करी घे प्रभू जाणूनी   अत:करणातील ठेवा   २ कर पडले चरणी […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, […]

गतकर्माची विस्मृती

एके दिनीं निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात    कसा असेल त्या वेळेचा   आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन   बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी   पूनर्जन्म घेण्याकरितां    गर्भाची निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी    आदर्शमय  जीवन जगेन   […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

1 143 144 145 146 147 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..