नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

गर्भातील आत्मा

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला, प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला ।।१।।   सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो, ‘तो’ मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।   मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे, नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।   आतां त्याचा निनाद ‘को..हं’, […]

तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी […]

पक्षी भाषा

बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४, मानवप्राणी तूं एक […]

सर्व वेळ प्रभूसाठी

लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे, मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे ।।१।।   ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून, जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?” ।।२।।   मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा, राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा ।।३।।   वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते, जीवन सारे […]

आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

चंद्र डाग

हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

पापाचा हिशोब

वेगाने तो जात असता,  घटना एक घडली  । तुडवले गेले जीव जंतू ,  त्याच्या पाययदळी  ।। ज्ञात नव्हते कांहीं त्याला,  त्याच्या कृत्याचे  । स्वकर्मा मध्ये गुंतले होते,  एक चित्त त्याचे  ।। नजर गेली अवचित त्याची,  एका सरड्यावरती  । दगड मारूनी बळी घेतला,  असूनी अंतरावरी  ।। पापाचा बने भागीदार,  मारूनी सरड्याला  । अकारण  कृत्य जे केले,  पात्र […]

चक्र

मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी  । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरती  ।। एके काळी हेच जनावर । जगले इतर जीवांवरती  ।। आज गमवूनी प्राण आपला । तोच दुजाची भाकरी बनती  ।। निसर्गाचे चक्र कसे हे । चालत असते सदैव वेगे  ।। एक मारूनी जगवी दुजाला । हीच तयाची विशेष अंगे  ।। […]

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे   करी जुळवणूक   कविते […]

1 147 148 149 150 151 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..