नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन । जाण त्याची येईल कोठून  ।। मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो । तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता । मना विचारा काय राहता  ।। ढोबळतेचा विचार येता । सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला । जाण नसते त्याची कुणाला  ।। गेला क्षण  परत न येई । आयुष्य तेवढेच व्यर्थ […]

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।।   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।।   भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला  ।।३।।   देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com                                                           […]

व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे […]

पडछाया!

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी […]

शब्द फुले

माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते,  प्रभू चरणांवर….१, राम नाम जपत,  कुणी एक येतात घटकाभरासाठी,  विश्रांती ते घेतात….२, रोज देती मजला,  ओंजळभर फूले कोणत्या बागेतली,  कधी न सांगीतले….३, त्यांच्याच सांगण्याने,  हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पितो….४, फूलांची ओंजळ ती,  नव्हे तो तर शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी,  उपयोगी पडावा….५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे […]

बागेतील्या तारका

बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           २   अगणित बघुनी  संख्यावरी     प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला        राहिले नाहीं भान         ३   शितलेतेच्या  वातावरणीं           शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी      पहांट ती झाली           ४   गेल्या निघूनी सर्व तारका       आकाशाला सोडूनी शोधूं लागले […]

ध्यानस्त शिव

शिव कुणाचे चिंतन करितो ? प्रश्न पडला मनी, तोच तर आहे प्रभू जगाचा काय तयाचे ध्यानी…१,   जेव्हां आम्ही चिंतन करितो, ध्यान लावी प्रभूकडे, प्रयत्न करूनी जगास विसरे, लक्ष केंद्रितो त्याजकडे….२,   उलट दिशेने शिवाचे चिंतन, चालते जगतासाठीं ध्यानामध्यें स्वतःसी विसरे, लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ….३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com       […]

1 148 149 150 151 152 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..