नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, ईच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण, हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करीता,  इतर मनाचे भाव जाणूनी, तेच अर्पण होत […]

बडवे – पुरोहित

बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग करूनी घेतो पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति दाखविती धर्माचे नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती पुरोहित असा असावा,  धर्माची करि उकलन भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग  देयी दाखवून प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें,  चिंतन करण्या […]

मोक्ष अंतीम फळ

मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला ।।१।।   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात ।।२।।   अपूरे झाले असतां कार्य, ज्ञानेश्वराच्या हातून, पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून ।।३।।   ध्रुव जगला पांच वर्षे, अढळ पद मिळवी, कित्येक जन्मीचे तपोबल, पांच […]

सत्य जीवन

हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा, दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।   अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे, खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।   नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा, मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।   बाह्यांगाचे कर्म […]

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।। जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।। ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।। बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

विचार, भावना व अंतरज्ञान

विचार, भावना अंतरज्ञान, संगत असते तिन्हीची यशस्वी करण्याजीवन, मदत लागते सर्वांची….१   तर्कशुद्धता ठरण्यासाठी, विसंगतीचा घेई आधार जीवनाचे सत्य उकलण्या, बुद्धी करीत राही विचार…२,   राग लोभ प्रेमादी गुण, जीवनाची चमकती अंगे, ‘भावनेचा’ आविष्कार होतां, एकत्र सर्वां चालण्या सांगे….३,   शोध घेत असता सत्याचा, अनेक अडचणी येती, सत्य हेच असूनी ईश्वर, अंतरज्ञान तेच पटविती….४   डॉ. […]

तृप्त मन

एक भिकारी लीन-दीन तो, भीक मागतो रस्त्यावरी, फिरत राही एकसारखा, या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।।   दिवस भराचे श्रम करूनी, चारच पैसे मिळती त्याला, पोटाची खळगी भरण्या, पुरून जाती दोन वेळेला ।।२।।   मिठाई भांडारा पुढती, उभा ठाकूनी खाई भाकरी, केवळ मिठाईचा आस्वाद, त्याच्या मनास तृप्त करी ।।३।।   देहाखेरीज कांहीं नव्हते, त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी, परि […]

देह एक बदलणारे घर

बदलत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, […]

मातृत्वाची कन्येस जाण

आई होऊन कळले मजला, कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता, झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही ।।३।।   […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणेX आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]

1 149 150 151 152 153 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..