नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे ।।१।।   कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।   एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।   हसतो कुणीतरी […]

तल्लीनतेत आहे ईश्वर

श्रीकृष्णाचे जीवन  बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन  चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा  शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

चि. पल्लवीस

भरून आले डोळे जेंव्हां, कढ मायेचे उचंबळले, हृदयामधल्या भावनेला, अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।। प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक, लोभसवाणे रूप मनोहर, आपुलकीने मने जिंकलीस, आनंदूनी सान थोर ।।२।। वागणुकीत दिसते किमया, हवी हवीसची तू सर्वांना, टिकवूनी ठेव गुणविशेष हा, यशस्वी करील तव जीवना ।।३।।  डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

आज-उद्या

‘उद्या’ साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी  । भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी  ।। ‘आज’ राहतो नजिक सदैव    ‘उद्या’ चालतो पुढे पुढे । आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे  ।। कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी   ध्येय ‘उद्या’ चे बघती । हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे होती  ।। समाधान  चित्तीं आणण्या […]

तुझे तुलाच देवून मोठेपण

वेडे आम्ही सारे, तुझेच घेवूनी तुला देतो, त्यातच मोठेपण मिरवितो…१, जाण आहे याची सर्व जगाला चकमा देतो, स्वत:लाही फसविता असतो….२, फुले बागेमधली तोडून तुजला वाहतो, हार त्यांचे करूनी घालतो….३, गंगेतील थोडे पाणी, अर्घ्य आम्ही तुला देतो, भक्तीभावाने अर्पण करितो….४, सारे असूनी तुझे, मीपणा हा सतत राहतो, परी हा भाव दुजासाठी असतो…५ डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो, त्यांना माहीत नव्हते, सहजपणे सुचणारे, संभाषण ते असते ।।१।। शिक्षण नव्हते कांहीं, अभ्यासाचा तो अभाव, परि मौलिक शब्दांनी, दुजावरी पडे प्रभाव ।।२।। जे कांहीं वदती थोडे, अनुभवी सारे वाटे, या आत्म्याच्या बोलामध्ये, ईश्वरी सत्य उमटे ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे  । खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे  ।।१।। झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके  । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके  ।।२।। संसार चक्र  भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी  । नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी  ।।३।। पिल्लांना त्या पंख फुटता, उडूनी गेल्या घरटे […]

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।। कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।। जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।। परिस्थितीच्या […]

श्रीकृष्णाचे जीवन

जीवन होते कृष्णाचे आगळे    विविधतेनें भरलेले सगळे, गूढ, घनदाट जंगलापरी    सारे पैलू साकार करी ।।१।। जंगलामध्यें झाडे वाढती    छोटी छोटी झुडुपे उगवती, पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी   जल सांचूनी बनली तळी ।।२।। गोड, आंबट, तुरट फळे    सुंगधी तशीच उग्र फुले, राघू, मैना, ससे, हरणे    तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे ।।३।। जंगल दिसते भरलेले पूर्ण    बरे वाईट यांचे चूर्ण, […]

1 152 153 154 155 156 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..