भूतदया
एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो. दया ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते. अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त […]