नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

वाहूनी कृष्णकमल तव शिरी, अर्पितो भाव माझे श्रीहरी….।।धृ।।   तू आहेस ईश्वर, करी सारे साकार नशिब माझे थोर मिळे तुझा आधार सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१, अर्पितो भाव माझे श्री हरी….   विविधतेने नटलेले कृष्णाचे जीवन गेले लय लागूनी जगले, कसे जगावे शिकवले जीवन सारे असूनी रूप ईश्वरी,  दाखवी स्वानूभवे तो हरी….२ अर्पितो […]

खरी शांतता

वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना….१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे….२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी…३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे […]

प्रथम शाहाणा कर

अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी  । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी  ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी  । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही  ।। निर्धनासी धन मिळता,  जाई हर्षूनी  । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी  ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण  । गैरउपयोग होई शक्तीचा,  नसता सामान्य ज्ञान  […]

एक समाधानी योगदान

सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता.   ” सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. ”  त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती  ।।१।।   अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी  ।।२।।   सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती  ।।३।।   तळमळ आता […]

न्याय देवते

कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी  ।। १ ।।   परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी  ।।२।।   दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी  ।।३।। […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. […]

जखमांचे वृण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती  ।।१।।   विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।   मनाची सबलता हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।   सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   — […]

1 159 160 161 162 163 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..