नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला […]

घास घास घेणे

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक […]

जादूगार तूं देवा ।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे  ।।१।।   निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या  ।।२।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता सारे पडती पाठी  ।।३।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।। — डॉ. भगवान […]

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

जग आणि देह – एक साम्य

शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  […]

1 160 161 162 163 164 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..