चि. मानसीस (दीड वर्षाच्या नातीस)
थांबव मानसी, चक्र वाढीचे, कळ्यातूनी तू फुलतांना, हासत खेळत तुरु तुरु चालणे, शिशू म्हणूनी जगतांना ।।१।। कौतुकाने ऐकतो तुज, शब्द बोबडे बोलतांना, हरखूनी जातो चाल बघूनी, हलके पाऊल पडतांना ।।२।। आनंद पसरे सभोवताली, इवल्या त्या प्रयत्नांनी, बदलूनी जाईल क्षणात सारे, रुळलेल्या तव हालचालींनी ।।३।। तुझ्यासाठी जे नवीन होते, प्रयत्न तुझा शिकून घेणे, अपूर्णतेची आमुची गोडी, लोप […]