नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मला देव दिसला – भाग १०

मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या […]

गतकाळ विसर

विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी ।।१।।   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी ।।२।।   ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा, अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

मला देव दिसला – भाग ९

आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. […]

मला देव दिसला – भाग ८

आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना […]

कठीण खेळ

चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।। — डॉ. […]

मला देव दिसला – भाग ७

प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे, न तेथे कसली तुलना  ।।१।।   आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी  ।।२।।   एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा, लुटाल कसा तृप्त होवूनी  ।।३।। […]

मला देव दिसला – भाग ६

बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धुत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले […]

काळपुरुष

शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता. भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती…१,   मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे…२,   हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती…३   अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान […]

1 163 164 165 166 167 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..