नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

ऋणमुक्त

आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची  परत फेड व्हावी आणि त्यासाठी  एखादी नैसर्गिक घटना घडावी   ह्यासारखी   समाधानाची दुसरी गोष्ट  असू शकत नाही. कृत्रिमरित्या  व आपल्या प्रयत्नाना   आपण एखद्या  गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।।   प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।।   प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी // जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी // वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें // वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा// कुणीतरी आला वाटसरु तो घेउन […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली,  वात दिसे जळताना जळेना परि वात ती,  दिव्यांत तेल असताना ।।१ जळत असते तेल,  देऊनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा  ।।२ बागडे मूल आनंदी,  तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते  ।।३ कष्ट त्याग हे जळती,  सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना,  जाणतील का कुणी ?  ।।४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।।   नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।।   जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

सनसेट अपियरन्स

डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व  शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते.  रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे. […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली  ।।१   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे ।।२   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा ।।३   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला ।।४   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो ।।५ […]

1 15 16 17 18 19 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..