नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

परमोच्य बिंदू

पाणी शोषत असतां ऊर्जा, उकळ बिंदूवर येते । पाण्याचे रुप बदलूनी, वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।। एक स्वभाव प्रकृतिचा, स्थित्यंतर जेव्हां घडते । एक स्थिती जावून पूर्ण, दुजामध्ये मिसळून जाते ।।२।। तपोबलाची ऊर्जा देखील, मानसिकता बदलून टाकीते । रागलोभादी षडरिपू जाऊनी, साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।। तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं, ईश्वरमय होऊन जाता । सारे […]

मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप

परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे. श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू […]

असामान्य व्यक्ती

सामान्यांतून असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे ।।१।। उदार होऊनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी….४, निर्जीव […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता […]

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या, रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं, क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली, श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची, हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।। बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।। कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।। संसार करूनी वंश वाढवी, […]

श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो । दृष्य दिसे बहुत आगळे ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा । सर्वजणां ही किमया न कळे ।। शिवलिंगापुढती ध्यान लावी । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।। सुंदर सुबक चित्रामध्ये । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।। श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं । आत्मरुप उजळून आले ।। शिवलिंगातील रामस्वरुप । एक होऊनी मग गेले ।। कोण भक्त […]

भीतीपोटी कर्म करता

भीतीपोटी सारे करतां, असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते त्रिकाळ चाले पूजा अर्चा, प्रभूविषयी होई चर्चा, बालपणींच पडे संस्कार, सारे देण्या समर्थ ईश्वर, कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते, भीतीपोटी सारे करता, असेच वाटते ।।१।। चूक असे हे ठसें मनाचे, कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे, सहभाग नसे यात प्रभूचा, सारा खेळ असे तो मनाचा, अपयश […]

अन्नासाठी दाही दिशा

बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जाऊनी भिडती, नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती ।।१।। शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी, मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई ।।२।। सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण दूषीत होते, संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करीते ।।३।। कारण जरी असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती […]

1 168 169 170 171 172 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..