निरोगी देही नामस्मरण
निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com