नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि….२ शक्तीच्या जोरावरती […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या […]

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १ बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २ अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३ शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४ गेल्या […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

कल्पकतेमुळे निराशा

निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।। जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।। तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।। सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।। अस्तित्वाची जाणीव […]

राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई । कैकयी त्याच्या सेवेत राही ।। राजनीति अन् युद्धनीति ही । अवगत झाली सारी तिजला ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी । रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।। सामान्य जनाला जर्जर करुनी । हा हाः […]

दयेची बरसात

समर्थ नाहीं कुणी, जाणून घेण्या प्रभूला, थोटके पडतो सारे, घेण्यास त्याच्या दयेला ।।१।। बरसत असे दया, प्रचंड त्या वेगाने, दुर्दैवी असूनी आम्हीं, झेलतो फाटक्या झोळीने ।।२।। असीम होते कृपा, पात्र नसूनी कुणी, तो बरसत राही सतत, परि आहे सारे अज्ञानी ।।३।। दयेच्या तो प्रवाह, वाहात राही नदीसारखा, डुबती कांहीं त्यांत, परि न दिसे अनेकां ।।४।। नशीब […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडी कर्मफळाचे एक अंग ते, टिपे दुसरे बाकी ।।१।। साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी, सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।। हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक, विनाश करीतो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।। बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी, वासनेच्या आहारी […]

ऋणमुक्त

आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची परत फेड व्हावी आणि त्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या अपेक्षित अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद […]

1 172 173 174 175 176 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..