अपूर्ण जीवन
सोडून दे अहंकार तुझा, लाचार आहेस आपल्या परि, पूर्ण जीवन तुला न मिळे, न्यूनता राहते कांहीं तरी ।।१।। धनराशी मोजत असतां, वेळ तुजला मिळत नसे, शरीर संपदा हाती नसूनी, मन सदा विचलित असे ।।२।। शांत झोपला कामगार , दगडावरी ठेवूनी डोके. देह सुदृढ असूनी त्याचा, पैशासाठी झुरतां देखे ।।३।। उणीवतेचा कांटा सलूनी, बाधा येत असे आनंदी, […]