पूजा तयारी
रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची । पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।।१ स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।।२ सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला । आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।।३ करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा । देवापुढती […]