शुद्धतेत वसे ईश्वर
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी । डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा । नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।। सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला । निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर […]