नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।। चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।। थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।। थकून जाई शरिर जेंव्हां, प्रयत्न […]

किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून…१, एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही….२, पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती….३, शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती, समाधान […]

तीन गुणाचे जीवन

तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे । जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे ।।१।। असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे । प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।। आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं । निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।। दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला । […]

खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर । पवित्रता भासे तेथे, […]

सूड वलय

उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।। नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।। स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।। स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।। ओंगळपणाचे चित्रण करती […]

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।। जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।। नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।। छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां, प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत […]

तन मनातील तफावत

देह मनातील, तफावत दिसून येते । चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते…१, चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२, परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो । शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो…३, दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही । परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई….४ […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

भास

चमचम चमकते नाणें   दूरी वरुनी दिसले । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा । खोटी चमक बाळगुनी    फसविणे गुणधर्म तयाचा ।।   भास ही चेतना ती    तर्क वाढीवी कसा । दिसून येई सदैव  मनावर जो उमटे ठसा ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे । मनावर बिंबून जाते […]

1 180 181 182 183 184 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..