नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

रावण वृत्ती

रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति । व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं । कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला । रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला….४   […]

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

पश्चाताप – एक जाणीव

संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते. मला एक […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा । दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी । हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले । बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी ।। […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।। एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।। सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख । दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।। तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा । परि अंर्तमन सांगत […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

1 183 184 185 186 187 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..