नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो. […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही ।।३।। […]

शांतता ( Silence )

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. […]

जन्म-मृत्युचे चक्र

खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा […]

शिळा झालेल्या अहिल्या

आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी काय करील ती अबला डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो […]

जीव ( प्राण-आत्मा )

जीवनातील रगाड्यातून- वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत […]

जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।। बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।। […]

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे […]

स्मरण असू दे

हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

1 187 188 189 190 191 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..