असुरक्षित जीवन
आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा // धृ // प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा – – – १ बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – – – 2 सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेना इथे लागतो केवळ पैसा रडते जीवन ढसाढसा – – – ३ डॉ. भगवान नागापूरकर […]