देह देव
हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।। प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।। ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com