नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सौंदर्यातील एक दर्शन

आकर्षण आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोन देखील वेगळाच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.


[…]

उतारवयांत जगतांना !

द्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. 
[…]

श्रीकृष्ण जन्मकथा

श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर १ दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती २ कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी ३ छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे ४
[…]

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो.
[…]

सोनेरी तसवीर !

सोनेरी तसवीर ! त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. […]

आनंद लुटणारे मन !

आनंद लुटणारे मन ! सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर टिप्पणी करीत होत्या. मान डोलावाने, टाळ्या वाजवणे, वाहवा ! […]

चिखलातले कमळ

चिखलातले कमळ जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती.
[…]

समाधान

समाधान दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे […]

1 207 208 209 210 211 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..