नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे   नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा   संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती   मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी […]

 सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई नको, […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान […]

ईश्वरी गुप्तधन

होता एक गरीब बिचारा  । किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।। कौलारु जुनी पडवी निवारा  । जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।   परिस्थितीनें गेला गंजूनी  । आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।। शरीर जर्जर झाले रोगांनी  । जगण्याची आशा उरे न मनीं  ।।   अवचित घटना एके दिनीं  । धन सापडे जमिनीतूनी  ।। मोहरांचा तो होता रांजण  […]

सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या ?   // हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं   // समजतील दुःखी तुजला    नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने      फूलवित रहा भाव   // जाणून घे स्वभाव सर्वांचे     रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे     तुझ्याच नव्या घरी   […]

चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा…

शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो. […]

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।   चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।   संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।।   आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।   नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।   ऋषीमुनींना ध्यान […]

किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून…१,   एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही….२,   पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती….३,   शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे […]

1 19 20 21 22 23 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..