Articles by डॉ. भगवान नागापूरकर
तुझे तुलाच अर्पण !
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित […]
कोलीडोस्कोप
कोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.
[…]
श्री विठ्ठल अवतार
श्री विठ्ठल अवतार श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १ पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २ सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३ तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न कळे प्रभूविना ४ असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५ […]
आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.
आषाढी एकादशी यात्रा- एक विचार. आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो.
[…]
क्रौंच पक्षाला मुजरा
पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते. ” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ” (जगातले तेच प्रथम […]
मला भाराऊन टाकल याने
बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
[…]
माना न माना !
हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.
[…]