नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

तीन गुणाचे जीवन

तीन गुणांनीं युक्त असूं द्या,  तुमचे जीवन सारे जीवन यश पताका तुम्हीं,  फडकवित रहा रे असती सारे ईश्वरमय,  याच भूतला वरचे प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे आनंद घेऊनी संसारांचा,  लक्ष्य असावे जीवनीं निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला आयुष्यातील कांहीं भाग,  अर्पा तुम्हीं समाजाला तीन […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं….१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची…२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले…..३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला….४, भाषेमधली शक्ती […]

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही,  प्रभूचे सतत नामस्मरण ,  असू घ्या मुखांत …१ काय सांगावी,  नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें,  प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३, नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय,  ईश समर्पण नामानी साधती,  प्रभू सर्वजण…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे….१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व […]

पोकळ तत्वज्ञान

ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली. […]

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची वृत्ती […]

धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।३।।   गीतेमध्ये दिले वचन    अर्जुनासी प्रभूचे  तोंडून प्रभूचे होईल पुनरागमन अत्याचार वाढता जगाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची […]

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। १ किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। २ सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। ३ बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०     […]

1 20 21 22 23 24 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..