दुधामधील चंद्र
कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले । शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले ।। गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी । आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी ।। मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा । वायु नव्हता फिरत नभी , मेघ राहती त्याच ठिकाणा ।। दूध आटवूनी प्रसाद […]