अनुभवाचे शहाणपण
बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर ।।१।। श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो ।।२।। तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले ।।३।। धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो ।।४।। देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां […]