नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

गांवमामा

हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय  प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच  […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।।   संसारांत रमलो    मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी   जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी   धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। १ बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। २ संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ३ ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस […]

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०   […]

भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।।   भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे  । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे  ।। १ निराशूनी जावू नकोस रागें रागें  । हिंमत बांधूनी जावेस  आगे आगे  ।। २ विणाविस यशाची शाल धागे धागे  । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे  ।। ३ सतत रहावे जीवनी जागे जागे  । तेव्हाच यश येत असते भागे भागे  ।। ४ डॉ. भगवान […]

जीवन परिघ

एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।।   वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।।   जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।   मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत […]

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

लहान मुलांचे बोल ऐकून  त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूरदर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते.  […]

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी । आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी  ।।१   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती । हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती ।।२   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी ।   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता । टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता ।।   डॉ. […]

1 26 27 28 29 30 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..