नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।।   निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला, नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी  १ जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी  २ सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं  ३ कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना  ४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।। १ चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।। २ संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।। ३ संचित पुण्य आजवरचे, […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।।   आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।   प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।   अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते […]

माईल स्टोन्स ( Mile Stones )

जीवनमार्गाचा जर आलेख काढला तर त्यावर टप्या टप्याने जीवनांत शारीरिक व मानसिक बदल होत असलेला जाणवतो. ह्याला माईल स्टोन्स Mile Stones   अर्थात जीवन मार्गातील मैलांचे दगड म्हणतात. ह्या खूणा तुमची जीवन पद्धती, वैचारीक जडन घडन कशी बदलत जाते. ह्याचे वर्णन करते. […]

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता  १ धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज  २ मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी ३ त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी […]

आनंदात गाऊं

प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं […]

1 2 3 4 5 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..