नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

चंद्राचे कायम स्वरूप

ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

पश्चाताप – एक जाणीव !

चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची  तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले  बचवात्मक  समाधान.  […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

आधार

वेलींना आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी  १ नष्ट करिल तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता  २ वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल  ३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे, वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म ।।१।।   वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल ।।२।।   आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई ।।३।।   अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने […]

जगरहाटी !

काळचक्रामध्ये  दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल  होत चाललेले दिसतात. काही बदलांनी  तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा केव्हा काही गोष्टी फक्त एक इतिहास म्हणून शील्लक राहतो. असल्या काही गोष्टी पूर्वी झालेल्या असतील, व होऊ शकतात ही शंका देखील मनांत येत नाही. कारण समाज कौटुंबिक रचना, व बाह्य  वातावरण  बदलले असते. […]

अजाणतेतील अपमान

स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।।   कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।।   पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।।   फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते,  थोडे मुरल्यानंतर  । आंबाही स्वादिष्ट लागे,  आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे,  ऐकता ज्ञानी विचार  । परिपक्वता त्यांच्यातील,  देई आनंदाला धार…२, परिपक्वता येण्यासाठीं,  अनुभवाची भट्टी हवी  । ज्ञान चमकते,  जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला,  मुरब्बी तो असतो  ।। अनुभवाच्या शक्तीनें,  योग्य पाऊल टाकतो…४ डॉ. भगवान नागापूरकर

1 30 31 32 33 34 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..