नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।। जन्म […]

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश

कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।।   प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते   बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते  ।।२।। […]

पिंडीतील ब्रह्मांड

विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती   सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं   विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता   जीव देहाचे पिंड,   […]

 चित्त मंदीरी हवे

लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदीरीं तो  । आदर दाखविण्या ईश्वरठायीं, प्रयत्न करीतो  ।। समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी  । मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई  ।। मंदीरी तुमचे शरीर असूनी, मन असे इतरीं  । श्रम तुमचे निरर्थक बनता,  मिळेल कसा श्रीहरी  ।। इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदीराकडे  । खरे पुण्य पदरीं पडते,  हेंच […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या– १—  या मित्रांनो सारे या,  हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]

जगदंबे रक्षण कर

विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी, जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी … ।। ध्रु ।। सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी, झोपेमध्ये जगा विसरता,  सर्ववेळी तू जाग्रण करी…।।१।। जगदंबे अवती –भवती,  राहून माझे रक्षण करी, धावपळीत चाले जीवन,  संकट भोवऱ्यात फिरून दुर्घटनेची चाहूल देवून,  मनास आमच्या दक्ष करी…२ जगदंबे अवती -भवती राहून […]

ऋणानुबंध

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे…४ डॉ, भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 31 32 33 34 35 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..